मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

दुबई साखर परिषद जागतिक साखर उद्योगासाठी दिशादर्शक - हर्षवर्धन पाटील -जगातील 70 देशाचा सहभाग

इंदापूर : प्रतिनिधी दि.11/2/25                 जगातील साखर उद्योग हा एक महत्वाचा उद्योग मानला जात आहे. सध्या जगात प्रत्येक उद्योगांमध्ये स्थित्यंतरे येत असल्याने जागतिक साखर उद्योगापुढील संभाव्य समस्यांवर सखोल उहापोह या परिषदेत केला जाणार असून, त्यांचे निराकरण करण्यासंदर्भातही सामूहिक विचारमंथन होणार आहे. त्यामुळे दुबई साखर परिषद ही जागतिक साखर उद्योगासाठी दिशादर्शक ठरणार आहे, असे प्रतिपादन भारताच्या राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी मंगळवारी (दि.11) केले.               दुबई येथे सोमवार दि.10 ते गुरुवार दि.13 फेब्रुवारी 2025 या कालावधीत जागतिक साखर उद्योगाची 9 वी दुबई साखर परिषद 2025 चालु झाली आहे. या दुबई साखर परिषदेमध्ये भारताच्या साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, अमित देशमुख, इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या अंकिता पाटील ठाकरे, निहार ठाकरे, व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे तसेच भारत सरकारचे सचिव दर्जाचे अधिकारी सहभागी झाले आहेत. या शुगर...

*तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची भेट चेन्नई येथे भेटीत साखर उद्योगावर संवाद!*

इंदापूर  चेन्नई येथे तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचेशी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची रविवारी (दि.9) भेट झाली. या भेटीप्रसंगी या दोन्ही नेत्यांनी तामिळनाडूतील साखर उद्योगाच्या विकासासंदर्भात संवाद साधला. तत्पूर्वी हर्षवर्धन पाटील यांची तामिळनाडूच्या सहकार मंत्र्यांबरोबर एक बैठक झाली           तामिळनाडू राज्यातील साखर उद्योगाच्या विकासासंदर्भात राज्य सरकार हे केंद्रीय सहकारिता विभागाला पत्र लिहिणार आहे, तसेच राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या माध्यमातून तामिळनाडू राज्याचा असलेला सरासरी साखर उतारा व देय एफआरपी या संदर्भात महासंघाचे अध्यक्ष म्हणून आपण पाठपुरावा करून मार्ग काढावा, अशी चर्चा मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन व हर्षवर्धन पाटील यांच्या भेटीमध्ये झाली. भारत सरकारच्या राष्ट्रीय सहकारिता मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव तसेच भारतीय राष्ट्रीय कृषि सहकारी विपणन संघ लिमिटेड (नाफेड) चे अतिरिक्त कार्यकारी संचालक पंकज कुमार बंसल यांचेकडील गिंडी,...

*बारामती येथून जिल्हास्तरीय कर्करोग तपासणी व जनजागृती मोहिमेचा शुभारंभ*

बारामती, दि.९: महिला शासकीय ग्रामीण रुग्णालय येथे जिल्हास्तरीय कर्करोग तपासणी व जनजागृती मोहिमेचा शुभारंभ तसेच कर्करोग मोबाईल वाहन व डिजिटल हेंडहेड एक्सरे यंत्राचे खासदार सूनेत्रा पवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.  यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नागनाथ यमपल्ले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचीन देसाई, वैद्यकीय अधीक्षक डॉ.बापू भोई, डॉ.महेश जगताप, तालुका आरोग्य अधिकारी, डॉ.मनोज खोमणे, वैद्यकीय अधिकारी, व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.  या वाहनात कोल्पोस्कोप,पॅप सिमीयर, डेंटल चेयर, सर्वायकल बायोस्पी, ओरल मुकोसा बायोस्पी अशी अत्याधुनिक उपकरणे आहेत. याद्वारे जिल्ह्यातील कर्करोगाची लक्षणे असलेल्या महिलांचे स्तन, मुख आणि गर्भाशय कर्करोगाची चाचणी ११ मार्च २०२५ पर्यंत करण्यात येणार आहे. महिलांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे डॉ. यमपल्ले यांनी केले आहे.  यावेळी महिला शासकीय ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भोई यांनी मान्यवरांचे स्वागत केले.