वाल्हे प्रतिनिधी - सिकंदर नदाफ साधू संतांचा वारसा लाभलेल्या वाल्हे नगरीत दरवर्षी विविध धार्मिक कार्यक्रम परंपरेनुसार साजरे होत असतात, परंतु अशा धार्मिक कार्यक्रमात हुल्लडबाजी करून गावाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी असे आवाहन रायगडचे उपजिल्हाधिकारी तसेच भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संदेश शिर्के यांनी केले. वाल्हे ( ता. पुरंदर ) येथे काही दिवसांपूर्वी बैलपोळा सणानिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणूकीत डीजेच्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली होती.यावेळी विविध गावच्या पुढाऱ्यांनी मध्यस्थी करून वाद मिटवण्याच्या प्रयत्नात राजकीय पोळी भाजून घेतल्याने या प्रकरणाची उलटसुलट चर्चा गावात सुरूच होती. त्यातच या प्रकरणात पुण्यासह वाई येथील हुल्लडबाज तरुणांचा हस्तक्षेप असल्याने आगामी दसऱ्याच्या सणात पुन्हा भांडणे होऊ नयेत यासाठी येथील भैरवनाथ मंदिरात ग्रामस्थांच्या वतीने सहविचार सभा घेण्यात आली. या सभेत संदेश शिर्के हे बोलत होते. ते पुढे म्हणाले दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो या दिवशी सीमोल्लंघन करून आयुष्यात नवीन आनंदद...