साधू संतांचा वारसा लाभलेल्या वाल्हे नगरीत दरवर्षी विविध धार्मिक कार्यक्रम परंपरेनुसार साजरे होत असतात, परंतु अशा धार्मिक कार्यक्रमात हुल्लडबाजी करून गावाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी असे आवाहन रायगडचे उपजिल्हाधिकारी तसेच भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संदेश शिर्के यांनी केले.
वाल्हे ( ता. पुरंदर ) येथे काही दिवसांपूर्वी बैलपोळा सणानिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणूकीत डीजेच्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली होती.यावेळी विविध गावच्या पुढाऱ्यांनी मध्यस्थी करून वाद मिटवण्याच्या प्रयत्नात राजकीय पोळी भाजून घेतल्याने या प्रकरणाची उलटसुलट चर्चा गावात सुरूच होती. त्यातच या प्रकरणात पुण्यासह वाई येथील हुल्लडबाज तरुणांचा हस्तक्षेप असल्याने आगामी दसऱ्याच्या सणात पुन्हा भांडणे होऊ नयेत यासाठी येथील भैरवनाथ मंदिरात ग्रामस्थांच्या वतीने सहविचार सभा घेण्यात आली. या सभेत संदेश शिर्के हे बोलत होते.
ते पुढे म्हणाले दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो या दिवशी सीमोल्लंघन करून आयुष्यात नवीन आनंददायी पर्वाची सुरवात केली जाते. परंतु अशा सणाला हुल्लडबाजांमुळे गालबोट लागू नये यासाठी पोलीस प्रशासनाने बंदोबस्त वाढवणे तितकेच गरजेचे आहे.
या प्रसंगी वाल्हे गावचे सरपंच अतुल गायकवाड यांसह पोलीस उपनिरीक्षक केशव जगताप हवालदार भाऊसो भोंगळे माजी पोलीस पाटील प्रवीण कुमठेकरतंटामुक्ती समितीचे अध्यक्ष जयवंत भुजबळ उद्योजक सुनील पवार अमोल खवले सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब राऊत माजी सभापती गिरीश पवार तसेच संभाजी पवार दत्तात्रय पवार सत्यवान सूर्यवंशी पांडुरंग भुजबळ मोतीराम गावडे राजेंद्र गायकवाड दिलीप पवार सागर भुजबळ बाळासाहेब पवार महादेव चव्हाण मंदिराचे पुजारी सचिन आगलावे आदी मान्यवर उपस्थित होते .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा