इंदापूर नगरपरिषदेचे गटनेते कैलास कदम यांचेकडून प्रभागात आर्सेनिक अल्बम औषधाचे वाटप.माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे शुभहस्ते मोहिनी दळवी व राहुल जौंजाळ यांना प्राथमिक स्वरूपात औषध देऊन शुभारंभ. इंदापूर तालुक्यात २१ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पाँझिटीव्ह आला होता.शहरात त्यापैकी १४ रुग्ण पाँझिटीव्ह सापडले होते.शहरातील कसबा भागातील ११ जणांचा यामध्ये समावेश होता.सर्वांना कोरोना उपचारानंतर घरी सोडण्यात आले असून जो कन्टेन्मेंट भाग म्हणून सिल करण्यात आला होता,तो खुला करण्यात आला आहे. शहरातील १ रुग्णाचा पुणे येथे मृत्यू झाला तर एकावर खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.नागरिकांची प्रतिकारशक्ती वाढावी यासाठी आर्सेनिक अल्बम औषधाचे वाटप करण्यात आले.कोविड१९ च्या प्रादुर्भावाच्या काळात आपले आरोग्य जपण्यासाठी रोगप्रतिकार क्षमता वाढविण्याचे आयुर्वेदिक उपायांची माहितीपत्रिका नगराध्यक्षा अंकिता शहा,इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकूंद शहा,गटनेते कैलास कदम यांचे हस्ते वाटण्यात आली.आजाराची लक्षणे दिसतात नागरिकांनी स्वतः हून उपचारासाठी पुढे आले पाहिजे असे आवाहन करण्या...