वाल्हे प्रतिनिधी - सिकंदर नदाफ दिव्यांगाप्रती समाजामध्ये स्नेहभाव वाढीस लागावा तसेच समाजातील एक उपयुक्त घटक म्हणून पुढे येण्यास त्यांना प्रेरणा मिळावी या उदात्त हेतूने वाल्हे ( ता. पुरंदर ) ग्रामपंचायतीच्या वतीने जागतिक दिव्यांग दिन उत्साहात साजरा करण्यात आला . यावेळी पुरंदर हवेलीचे माजी आमदार संजय जगताप यांच्या हस्ते दिव्यांग बांधवांचा सत्कार करून त्यांना स्थानिक ग्रामपंचायतीच्या वार्षिक उत्पन्नातून ५℅ निधीचे वाटप करण्यात आले. या दरम्यान माजी आमदार संजय जगताप म्हणाले, दीर्घकालीन शारीरिक मानसिक तसेच बौद्धिक दुर्बलतेवर एक प्रकारे मात करून यशस्वीरित्या जीवन जगण्याचा प्रयत्न करणाऱ्या दिव्यांग बांधवांचा आदर्श प्रत्येकाने घेतला पाहिजे. तसेच शासन स्तरावर दिव्यांगांसाठी विविध कल्याणकारी योजना कार्यान्वित असून दिव्यांग बांधवांना अशा योजनांचा सुलभतेने लाभ घेता यावा यासाठी शर्तीचे प्रयत्न देखील करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी वाल्हे गावचे सरपंच अतुल गायकवाड उपसरपंच सागर भुजबळ भाजपचे सचिन लंबाते माजी सभापती गिरीश पवार यांसह दत्तात्रय पवार महादेव च...