मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

 संत गुलाब बाबा पालखी सोहळ्याचे साध्या पद्धतीने प्रस्थान
इंदापूरतालुक्यातील - रेडा येथील प्रसिद्ध देवस्थान संत गुलाब बाबा मंदिरातून,संत गुलाब बाबा पालखी सोहळ्याचे सालाबाद प्रमाणे व कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी फक्त मुख्य मंदिरात, सिद्धेश्वर संत गुलाब बाबा यांच्या पादुकांचे विधिवत पूजन करून गावच्या सरपंच द्रोपदा देवकर यांच्या हस्ते प्रस्थान करण्यात आले.

              यावेळी संत गजानन महाराज,साईबाबा व दत्त यांच्या पूजनाने,तसेच संत गुलाब बाबा भजनी मंडळ रेडा यांच्या मधुर अभंग वाणीने,पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम असा गजर करीत,मानाचा अश्व  पूजन करण्यात आला.तसेच पालखी रथाची बैलजोडी,विना पूजन,मानाचे चोपदार तुळशी पूजन यावेळी करण्यात आले.शासनाच्या नियमानुसार सोशल डिस्टेंसिंगचे तंतोतंत पालन करण्यात आले.मास्क तोंडाला लावून हरिनामाचा गजर करण्यात आला.

                  संत गुलाब बाबा संस्थान चे अध्यक्ष ॲड. तानाजीराव देवकर,निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक बबनराव देवकर,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे इंदापूर तालुका अध्यक्ष नीळकंठ मोहिते,माजी उपसरपंच भीमराव यादव,प्राध्यापक आत्माराम देवकर,नानासाहेब देवकर,तुकाराम जगदाळे तुकाराम देवकर,ह.भ.प उंबराव महाराज देवकर,ह.भ.प.अनिल महाराज मोहिते,अशोक महाराज मोहिते,सोमनाथ महाराज पोळ,नामदेव भोसले,संतोष देवकर,ॲड.योगेश देवकर,सोमनाथ देवकर,धनंजय गायकवाड,यांच्यासह मानाचे पंचवीस वारकरी उपस्थित होते.

             यावेळी संत गुलाब बाबा संस्थान चे अध्यक्ष अँँड.तानाजीराव देवकर म्हणाले की,जगभर कोरोना सारखा आजार पसरला असून,यावर्षी संत गुलाब बाबा यांचा पालखी सोहळा विस्तृत प्रमाणात क्षेत्र पंढरी दर्शनासाठी जाणार नाही.तरीदेखील परंपरा खंडित होऊ नये.म्हणून मंदिरातच पालखीचे प्रस्थान करून पादुका मंदिरातच राहणार आहेत.पुणे जिल्हाधिकारी व संबंधित विभागाकडे संत गुलाब बाबा यांच्या पालखी सोहळ्यातील पाच प्रतिनिधींना पादुका घेऊन दर्शनासाठी परवानगी मिळण्यासाठी अर्ज दाखल केला आहे.त्यामुळे दरवर्षी पालखी समवेत चालणाऱ्या वारकऱ्यांनी यंदा आपल्या राहत्या घरात बसूनच विठुरायाचे नामस्मरण करावे असे आव्हान संस्थानचे अध्यक्ष अँँड.तानाजीराव देवकर यांनी केले आहे.






         

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापुर में श्रीमती मालती सुरेशदास शाह के तत्वाधान में शाह ग्लोबल स्कूल का उद्घाटन। उन्नत शिक्षा प्रदान करने के लिए प्रतिबद्ध: मुकुंदशेठ शाह.

 इंदापुर, डॉ. संदेश शाह.   माता-पिता हम पर भरोसा करते हैं और अपने बच्चों का दाखिला शाह ग्लोबल स्कूल, इंदापुर में कराते हैं। शाह परिवार इस विश्वास को कहीं भी टूटने नहीं देगा. इंदापुर तालुका में   एक समय शिक्षा सुविधाओं के अभाव में वर्ष 1938 में हमारे दादाजी ने एक स्कूल और बाद में एक कॉलेज की स्थापना की। इंदापुर नगर परिषद के पूर्व उपाध्यक्ष भरतशेठ शाह ने विचार व्यक्त करते हुए कहा कि यह संयोग है कि उनके परपोते अंगद शाह ने उसी विरासत को संरक्षित करते हुए और आधुनिक शिक्षा की आवश्यकता को पहचानते हुए शहा ग्लोबल स्कूल की शुरुआत की।  इंदापुर शहर के मालवाड़ी रोड के पास शाह ग्लोबल स्कूल का उद्घाटन 13 जून को श्रीमती मालती सुरेशदास शाह ने फीत काटकर किया। वरिष्ठ नागरिक संघ के पूर्व अध्यक्ष नंद कुमार गुजर, शाह ग्लोबल स्कूल के ट्रस्टी मुकुंदशेठ शाह, इंडियन मेडिकल एसोसिएशन इंदापुर शाखा के संस्थापक डाॅ. संजय शाह, विद्यालय प्रबंधक अंगद शाह मौजूद रहे। इंदापुर नगर परिषद की पूर्व महापौर अंकिता शाह, इंदापुर रोटरी क्लब के पूर्व अध्यक्ष वसंतराव मालुंज...

प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मंत्रिस्तरावर हालचाली – अभिजीत भैय्या तांबिले यांच्या पाठपुराव्याला यश

इंदापूर तालुक्यातील उजनी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या हक्कांबाबत माजी जिल्हा परिषद सदस्य अभिजीत भैय्या तांबिले यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर राज्याचे कृषी मंत्री मा. दत्तामामा भरणे यांनी तात्काळ दखल घेतली आहे. या विषयावर कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांची जलसंपदा मंत्री मा. राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली आहे. या चर्चेच्या पुढील टप्प्यात आज होणाऱ्या कॅबिनेट बैठकीतही दत्तामामा भरणे हे जलसंपदा मंत्री मा. विखे-पाटील यांच्याशी उजनी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नावर थेट चर्चा करणार आहेत. तसेच या संदर्भात जलसंपदा विभागाकडे कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांनी अधिकृत पत्रही सादर केले असल्याची माहिती अभिजीत भैय्या तांबिले यांनी दिली. अभिजीत भैय्या तांबिले यांनी यापूर्वी कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांची भेट घेऊन उजनी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या वहिवाटी, मालकी हक्क आणि प्रशासनाकडून होणाऱ्या अडचणींबाबत सविस्तर निवेदन दिले होते. त्या निवेदनाची तात्काळ दखल घेत मंत्रिस्तरावर हालचाली सुरू झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. यापूर्वी माजी उपमुख्यमंत्री मा. अज...

*तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची भेट चेन्नई येथे भेटीत साखर उद्योगावर संवाद!*

इंदापूर  चेन्नई येथे तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचेशी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची रविवारी (दि.9) भेट झाली. या भेटीप्रसंगी या दोन्ही नेत्यांनी तामिळनाडूतील साखर उद्योगाच्या विकासासंदर्भात संवाद साधला. तत्पूर्वी हर्षवर्धन पाटील यांची तामिळनाडूच्या सहकार मंत्र्यांबरोबर एक बैठक झाली           तामिळनाडू राज्यातील साखर उद्योगाच्या विकासासंदर्भात राज्य सरकार हे केंद्रीय सहकारिता विभागाला पत्र लिहिणार आहे, तसेच राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या माध्यमातून तामिळनाडू राज्याचा असलेला सरासरी साखर उतारा व देय एफआरपी या संदर्भात महासंघाचे अध्यक्ष म्हणून आपण पाठपुरावा करून मार्ग काढावा, अशी चर्चा मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन व हर्षवर्धन पाटील यांच्या भेटीमध्ये झाली. भारत सरकारच्या राष्ट्रीय सहकारिता मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव तसेच भारतीय राष्ट्रीय कृषि सहकारी विपणन संघ लिमिटेड (नाफेड) चे अतिरिक्त कार्यकारी संचालक पंकज कुमार बंसल यांचेकडील गिंडी,...