प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मंत्रिस्तरावर हालचाली – अभिजीत भैय्या तांबिले यांच्या पाठपुराव्याला यश
इंदापूर तालुक्यातील उजनी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या हक्कांबाबत माजी जिल्हा परिषद सदस्य अभिजीत भैय्या तांबिले यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर राज्याचे कृषी मंत्री मा. दत्तामामा भरणे यांनी तात्काळ दखल घेतली आहे. या विषयावर कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांची जलसंपदा मंत्री मा. राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली आहे.
या चर्चेच्या पुढील टप्प्यात आज होणाऱ्या कॅबिनेट बैठकीतही दत्तामामा भरणे हे जलसंपदा मंत्री मा. विखे-पाटील यांच्याशी उजनी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नावर थेट चर्चा करणार आहेत. तसेच या संदर्भात जलसंपदा विभागाकडे कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांनी अधिकृत पत्रही सादर केले असल्याची माहिती अभिजीत भैय्या तांबिले यांनी दिली.
अभिजीत भैय्या तांबिले यांनी यापूर्वी कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांची भेट घेऊन उजनी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या वहिवाटी, मालकी हक्क आणि प्रशासनाकडून होणाऱ्या अडचणींबाबत सविस्तर निवेदन दिले होते. त्या निवेदनाची तात्काळ दखल घेत मंत्रिस्तरावर हालचाली सुरू झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
यापूर्वी माजी उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांनी शेतकऱ्यांच्या बाजूने सहानुभूतीपूर्वक विचार करून वहिवाटीचे आदेश दिले होते. त्या निर्णयाच्या अनुषंगाने आता पुन्हा शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये, यासाठी शासनस्तरावर समन्वयातून ठोस मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
उजनी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा हा प्रश्न हजारो कुटुंबांच्या उपजीविकेशी संबंधित असून, मंत्रिस्तरावर सुरू असलेल्या या हालचालींमुळे लवकरच सकारात्मक निर्णय होईल, असा विश्वास अभिजीत भैय्या तांबिले यांनी व्यक्त केला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा