मुख्य सामग्रीवर वगळा

स्वराज्य निर्माता न्युज, समृद्धी टाईम्स न्युज

पुणे सोलापूर रोड वरील अनेक ढाब्यावर पाहिजे ती दारू चढ्या भावाने विक्री जोमात....कारवाई करण्यासाठी कोणी फिरकेनात..
इंदापुर:कोरोनाचा प्रभाव संपूर्ण जगावरती जाणवत असून एका व्यक्तीपासून अनेक व्यक्तींना याची लागण होऊन झपाट्याने रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे सध्या जगामध्ये लाखो लोक या रोगाने संक्रमित झालेले असून हजारो लोक मृत्यू पावत आहेतअनेक प्रगत देश देखील यामुळे हतबल झाले असून या व्हायरसवरती औषध सापडलेले नाही त्यामुळे यावर एकच उपाय नागरीकांनी घराच्या बाहेर न पडणे स्वतःला वेगळे ठेवणे हाच पर्याय सध्या तरी असून
अनेक देशांनी लॉक डाऊन केलेला आहे . त्याचप्रमाणे आपल्या देशाचे पंतप्रधान मा .नरेंद्र मोदी यांनी देखील २१ दिवसाचा लोक डाऊन घोषीत केलेला आहे नागरिकांनी घराच्या बाहेर पडू नये तसेच जेथे आहे तेथेच थांबावे हा पण....
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर
संपूर्ण देश लोकडाऊन असतांना देखील मद्यपान
करणार्यांना काही दम पडेना इंदापूर तालुक्यातील पुणे सोलापूर रोड ,बारामती-इंदापुर अकलूज रोड  वरील अनेक ढाब्यावर पाहिजे ती दारू विक्री आजही सुरू आहे. 
ज्या बियरबार चे मालक गि-हाइक येत नाही म्हणून माशा मारत बसत आसणारे आज दारू साठी जास्त लोक येतात म्हणून माजल्या सारखं वागतात, चोरून दारू विक्री करणे आज गोरख धंदा बनला आहे, चढ्या भावाने दारू विक्री करतात, कारण प्रशासनातील काही अपवाद वगळता लोकं सायंकाळी गर्दी करताना पहायला मिळतात, "वीरो की कद्र नही भडवे आगे बढे, पती व्रता भुकी मरे क्षिणाल  खाये पेढे " हे संताचे सुंदर वाक्य आज तंतोतंत जुळत आहेत.अनेक खेड्या पाड्यात दारूडी  लपून छपून दारू विकत
घेत आहेत. याचा मोठा फायदा दारू  विक्रेत्यांना होतांना
दिसतोय अनेक ठिकाणी दारू विक्रेते भाव वाढवून दारू 
विक्री करत असून जी देशी दारू ची बाटली आगोदर  ६०
रुपयांना विकली जायची ती आता
१५०,ला तर मॅकडाॅल २००रूपया ,ची४०० रु. ला 170रूपयाची किंगफिशर बियर 300रूपयाला, ऑफिसर चाॅईस 120रूपयाची 300ला,गोवाजीन 92रूपयाची 200ला ,डाॅक्टर 100ची 200ला,ओशीब्लयु 160रूपयाची 300रूपयांना,विकली जात आहे. दारू  विक्रेते एका बॉटल मागे १०० ते २०० रुपये
अधिक उकळतायत. केवळ दारू  नाही तर सिगारेट ,
गुटखा, गांजा  या सारख्या व्यसनांचे देखील भाव
विक्रेत्यांनी वाढवले आहे. एकीकडे सामान्य नागरिक
जीव मुठीत धरून कोरोना सारख्या भयावह
महामारीचा प्रकोप कमी होण्याची वाट बघत आहे. तर
दुसरीकडे या व्यसनींची वेगळीच धूम सुरु आहे. इंदापूर
येथील सुरक्षा यंत्रणेचे कर्मचारी कोरोनाशी लढा देण्यात
व्यस्त असल्याचा फायदा दारू  विक्रेते घेत आहेत.
विशेष म्हणजे ग्रामीण भागातील अनेक दारू  विक्रेते
विना परवाना ही विक्री करत आहे. तंबाखू आणि
सिगारेटचे दर देखील गगनाला भिडले आहेत. त्यातच किराणा दुकान दार अपवाद वगळता माजले आहेत आणि दुसरीकडे खेडे गावातील बेकायदेशीर धंद्याच्या विरोधात कोणी ही समाजसेवक समोर का येत नाही हि लाजीरवानी बाब आहे   
भिमानगर ता.माढा जि. सोलापूर येथील एका बियरबार मध्ये रस्त्यावर खुलेआम दारू विक्री चढ्या भावाने सुरू आहे त्या वर प्रशासन कारवाई कधी करणार का....त्यांना अभय देणार.....या बियरबार मुळे गर्दी वाढत आहे, नेहमी रेलचेल, दारू पिणारे मास्कचे वापर करत नाहीत...प्रशास्किय अधिकारी मुग गिळून गप्प का..? रस्त्यावर वरून येणारा प्रत्येक जन अपवाद वगळता,  दारू च्या शोधात याच बारवर येत आहे .या मुळे सोलापूर जिल्ह्याला कोरोना चा धोका निर्माण झाला आहे...कोरोना ला सहज घेऊ नका कर्फ्यु पाळा....


********************************************

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापुर में श्रीमती मालती सुरेशदास शाह के तत्वाधान में शाह ग्लोबल स्कूल का उद्घाटन। उन्नत शिक्षा प्रदान करने के लिए प्रतिबद्ध: मुकुंदशेठ शाह.

 इंदापुर, डॉ. संदेश शाह.   माता-पिता हम पर भरोसा करते हैं और अपने बच्चों का दाखिला शाह ग्लोबल स्कूल, इंदापुर में कराते हैं। शाह परिवार इस विश्वास को कहीं भी टूटने नहीं देगा. इंदापुर तालुका में   एक समय शिक्षा सुविधाओं के अभाव में वर्ष 1938 में हमारे दादाजी ने एक स्कूल और बाद में एक कॉलेज की स्थापना की। इंदापुर नगर परिषद के पूर्व उपाध्यक्ष भरतशेठ शाह ने विचार व्यक्त करते हुए कहा कि यह संयोग है कि उनके परपोते अंगद शाह ने उसी विरासत को संरक्षित करते हुए और आधुनिक शिक्षा की आवश्यकता को पहचानते हुए शहा ग्लोबल स्कूल की शुरुआत की।  इंदापुर शहर के मालवाड़ी रोड के पास शाह ग्लोबल स्कूल का उद्घाटन 13 जून को श्रीमती मालती सुरेशदास शाह ने फीत काटकर किया। वरिष्ठ नागरिक संघ के पूर्व अध्यक्ष नंद कुमार गुजर, शाह ग्लोबल स्कूल के ट्रस्टी मुकुंदशेठ शाह, इंडियन मेडिकल एसोसिएशन इंदापुर शाखा के संस्थापक डाॅ. संजय शाह, विद्यालय प्रबंधक अंगद शाह मौजूद रहे। इंदापुर नगर परिषद की पूर्व महापौर अंकिता शाह, इंदापुर रोटरी क्लब के पूर्व अध्यक्ष वसंतराव मालुंज...

प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मंत्रिस्तरावर हालचाली – अभिजीत भैय्या तांबिले यांच्या पाठपुराव्याला यश

इंदापूर तालुक्यातील उजनी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या हक्कांबाबत माजी जिल्हा परिषद सदस्य अभिजीत भैय्या तांबिले यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर राज्याचे कृषी मंत्री मा. दत्तामामा भरणे यांनी तात्काळ दखल घेतली आहे. या विषयावर कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांची जलसंपदा मंत्री मा. राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली आहे. या चर्चेच्या पुढील टप्प्यात आज होणाऱ्या कॅबिनेट बैठकीतही दत्तामामा भरणे हे जलसंपदा मंत्री मा. विखे-पाटील यांच्याशी उजनी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नावर थेट चर्चा करणार आहेत. तसेच या संदर्भात जलसंपदा विभागाकडे कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांनी अधिकृत पत्रही सादर केले असल्याची माहिती अभिजीत भैय्या तांबिले यांनी दिली. अभिजीत भैय्या तांबिले यांनी यापूर्वी कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांची भेट घेऊन उजनी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या वहिवाटी, मालकी हक्क आणि प्रशासनाकडून होणाऱ्या अडचणींबाबत सविस्तर निवेदन दिले होते. त्या निवेदनाची तात्काळ दखल घेत मंत्रिस्तरावर हालचाली सुरू झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. यापूर्वी माजी उपमुख्यमंत्री मा. अज...

*तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची भेट चेन्नई येथे भेटीत साखर उद्योगावर संवाद!*

इंदापूर  चेन्नई येथे तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचेशी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची रविवारी (दि.9) भेट झाली. या भेटीप्रसंगी या दोन्ही नेत्यांनी तामिळनाडूतील साखर उद्योगाच्या विकासासंदर्भात संवाद साधला. तत्पूर्वी हर्षवर्धन पाटील यांची तामिळनाडूच्या सहकार मंत्र्यांबरोबर एक बैठक झाली           तामिळनाडू राज्यातील साखर उद्योगाच्या विकासासंदर्भात राज्य सरकार हे केंद्रीय सहकारिता विभागाला पत्र लिहिणार आहे, तसेच राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या माध्यमातून तामिळनाडू राज्याचा असलेला सरासरी साखर उतारा व देय एफआरपी या संदर्भात महासंघाचे अध्यक्ष म्हणून आपण पाठपुरावा करून मार्ग काढावा, अशी चर्चा मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन व हर्षवर्धन पाटील यांच्या भेटीमध्ये झाली. भारत सरकारच्या राष्ट्रीय सहकारिता मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव तसेच भारतीय राष्ट्रीय कृषि सहकारी विपणन संघ लिमिटेड (नाफेड) चे अतिरिक्त कार्यकारी संचालक पंकज कुमार बंसल यांचेकडील गिंडी,...