जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साखरे वस्ती येथे नवागतांचे स्वागत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन श्री. नानासाहेब खरात उपस्थित होते तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश साखरे, अंगणवाडी सेविका व माता पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते .
प्रमुख पाहुणे नानासाहेब खरात व इतर मान्यवरांच्या हस्ते सरस्वतीचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रथम नवागतांचे स्वागत पुष्प देऊन करण्यात आले त्यानंतर प्रमुख पाहुणे श्री. नानासाहेब खरात यांनी सर्व मुलांना लेखन साहित्याचे वाटप केले, यावेळी नानासाहेब खरात म्हणाले की खरंच जिल्हा परिषद शाळा या मुलांना खरंच संस्काराचे खूप मोठे केंद्र आहेत जिल्हा परिषद शाळेत शिक्षणाबरोबर संस्कारही मोलाचे मिळतात,तेजपृथ्वी ग्रुपच्या माध्यमातून या शाळेसाठी कायमस्वरूपी जेवढे बी चांगले उपक्रम असतील ते राबवण्याचा आजपर्यंत आणि इथून पुढेही कायम आम्ही प्रयत्न करू यावेळी शाळेकडून विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप करण्यात आली तर तेजपृथ्वी ग्रुपच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना वही पेन खाऊ अंकलपी व इतर शाळेचे साहित्य वातप करन्यातआले,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक श्री काकासाहेब जाधव यांनी केले. शेवटी मुलांना गोड खाऊचे वाटप करून कार्यक्रमाचे आभार शाळेतील शिक्षक श्री. मल्लिकार्जुन वच्चे गुरुजी यांनी मांडले. अतिशय उत्साहाच्या वातावरणात कार्यक्रम पार पडला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा